Take a fresh look at your lifestyle.

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत

पुण्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावरील प्रकार, एमपीएससीकडून कायदेशीर कारवाई

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १ परीक्षा राज्यभरातील सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या प्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल घेत एमपीएससीच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला.

एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, की सदर परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या आधारे गैरप्रकाराचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आयोगाच्या दक्षता पथकाने अचानकपणे संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यात संबंधित उमेदवाराकडे गुन्हापात्र साहित्य आढळले. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.