Take a fresh look at your lifestyle.

Breaking : सामाजिक तेढ निर्माण करण्यांना बसणार चाप, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय

Mumbai Police : मुंबईत सामाजिक तेढ निर्माण करण्यांना आळा घालण्यसाठी मुंबईत पोलिसांनी सोशल मीडिया लॅब सक्रिय केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 61 जणांना अटक करण्यात आली आहे.

0

Social Media Lab : सध्या राज्यासह देशातीस परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत.

रामनवमीपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात, तिसरा गुन्हा कुरारा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून मानखुर्द घटनेत आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. कुरार प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. गोरेगाव प्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी आतापर्यंत 61 जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.