मुंबईत Shivaji Park येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर MNS तर्फे पुष्पवृष्टी, राज ठाकरेंची उपस्थिती
शिवाजी पार्कवर मनसेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti) यांच्या जयंतनिमित्त आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी जमले आहेत. विशेष म्हणजे मनसेतर्फे आज येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (Flowering on Shivaji Maharaj Statue) करण्यात आली. आजच्या सोहळ्याकरिता मनसेतर्फे शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार न करता तिथनुसार, साजरी करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसेतर्फे कार्याक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुष्पवृष्टीचे हवाई दृश्य उपलब्ध झाले आहेत.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी
सोमवारी सकाळच्या वेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी असंख्य शिवप्रेमींची उपस्थिती होती. आकाशातून रंगीत फुलांची बरसात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर झाली. हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांची बरसात होताना शेकडो मनसे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते. या घोषणांनी अवघा शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमून गेला होता. ह्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस सौ.शालीनी ठाकरे यांनी केलेले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परीसरात होत असून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी ही अभिजित पानसे व सचिव सचिन मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.