एसटी संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची पायपीट; केंद्रावर पोचण्यासाठी धावपळ
अलिबाग : बारावीची परीक्षा (hsc exam) सुरू झाली आहे.
अलिबाग : बारावीची परीक्षा (hsc exam) सुरू झाली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रायगड जिल्ह्यात (Raigad) एसटी सेवा मंदावली असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. कोरोना परिस्थिती (corona pandemic) आणि एसटीचा संप (ST bus strike) लक्षात घेऊन शिक्षण विभागाने बारावी परीक्षा केंद्रात (exam center) वाढ केली असली तरीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना केंद्रावर पोचण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते.
पोलादपूर, श्रीवर्धन आणि म्हसळा यांसारख्या तालुक्यांमधील नागरिकांना दळण-वळणासाठी एसटी हाच पर्याय आहे. संपामुळे या भागातील अंतर्गत वाहतूक अद्याप खंडित आहे. खासगी वाहनाने करावा लागणारा प्रवास खर्च न परवडणारा आहे. विद्यार्थ्यांना हा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. या संदर्भात म्हसळा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली.