Take a fresh look at your lifestyle.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.

0

अकोला : अनाथांची माय असलेल्या, आदिवासी संघर्ष समितीच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ यांचे आज मंगळवार दि . ०४/०१/२०२२ रोजी पुणे येथे, गॅलेक्सी हॉस्पिटल येथे, ८ : १० वाजता , हदयविकाराने दुःखद निधन झाले . अनाथांची माय असलेल्या सिंधुताई यांनी, दारिद्रयरेषेत, मेळघाट – चिखलदरा परिसरात आपले बालपण घालवले होते .

इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या सिंधुताईंचे वयाच्या ९व्या वर्षी लग्न झाले होते . लग्नानंतर त्यांना तत्कालिन परिस्थितीमध्ये भयंकर सासरवास व संकटांना तोंड द्यावे लागले होते . अखेर जुलूमाविरुद्ध अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी दंड थोपटले . त्यांनी आपल्या हयातीत कित्येक अनाथ मुलामुलींचे संगोपन केले . व त्यांचे शिक्षण, रोजगार व विवाह लावून दिले .

आज त्या हजारो अनाथांच्या माई होत्या. हजारो मानसकन्यांच्या माता होत्या . हजारो जावायाच्या सासूबाई होत्या . पुढे त्यांचे कार्य पाहून अनेकांनी त्यांना सन्मान दिला . ” माई “, ” वात्सल्यमुर्ती . ” इत्यादी नावांनी त्या ओळखल्या जातात . आजपर्यंत विविध संस्थानी त्यांना जवळ जवळ साडे सातशे पुरस्कार दिले . त्यांच्या जीवनावर ” म सिंधुताई सपकाळ ” हा मराठी चित्रपट सुद्धा निघाला .केंद्रशासनाने त्यांना पदमश्री पुरस्कार सुद्धा दिला होता . . उद्याला शासकिय इतमामात हजारो अनाथ लेकरांच्या या मायमाऊलीचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळते .

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.