Take a fresh look at your lifestyle.

नाशिक मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले.

0

नाशिक : केंद्रीय अंदाजपत्रकात घोषणा होवूनही मेट्रो निओचा नारळ फुटत नसल्याने शिवसेनेच्या (Shivsena) हाती अपप्रचाराचे आयते कोलीत हाती लागण्याच्या शक्यतेने दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडे मेट्रो निओची सल व्यक्त झाल्यानंतर तातडीने पावले उचलत प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साधारण १५ मार्चच्या आत प्रकल्पाचे उद्‌घाटन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन होण्याची तयारी असली तरी राज्याचे सर्व नेते नाशिकमध्ये उद्‌घाटनासाठी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राईटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगष्ट २०१९ मध्ये ‘मेट्रो निओ’ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००. ६ कोटी खर्च येणार असून राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १,१६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.