Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महापालिकेची निवडणूक एप्रिल मध्ये किंवा अखेरीस?

नाशिक महापालिकेची निवडणूक

0

नाशिक : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारताना पुढील निर्देश येत नाही, तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार साधारण १५ ते २० मार्चच्या दरम्यान निवडणुकीची घोषणा होऊन एप्रिलच्या मध्यावर किंवा अखेरच्या आठवड्यात नाशिक महापालिका निवडणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका क्षेत्रातील एकूण १३३ जागांपैकी १०४ जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध राहतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण रद्द ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारमध्ये इम्पिरिकल डाटावरून वाद निर्माण झाला. राज्याच्या कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षणाचा ठराव करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होऊन आरक्षण संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवालात नसल्याचे मत न्यायालयाने अहवालात नोंदविले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, अशा सूचना दिल्या. लांबलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने तत्काळ जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षित जागा खुल्या प्रवर्गातील म्हणून जाहीर कराव्यात, अशा सूचना दिल्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यास एप्रिलमध्ये निवडणुका शक्य आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.