शालेय विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
जि.प.शाळा कठोरा येथील १२९ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण
शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या १३० विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात आले आहे.
बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते,याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व मुला,मुलींना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य रक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्यावतीने सदर जंतनाशक मोहिम राबविण्यात आलेली आहे.
याप्रसंगी आरोग्य विभागातील आरोग्य सेवक एस.आर. भोंबळे,शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी हे उपस्थित होते.