Take a fresh look at your lifestyle.

वृद्धाश्रमात माता पिता पाठवणे बंद झाले म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुशिक्षित होऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. – ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

- मुळे अण्णांच्या कार्याचे विशेष कौतुक - मा.श्री.रमेश अण्णा मुळे यांनी आत्तापर्यंत समाजकार्यासाठी 4 ते 5 कोटी चा खर्च केल्याबद्दल यांच्या समाज कार्याला सलाम

0

उध्दव नागरे
लोणार :-
दि. 9 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिना निमित्त मा.श्री.रमेश आण्णा मुळे संस्थापक अध्यक्ष मुळे अण्णा फाउंडेशन संभाजी नगर औरंगाबाद यांच्या वतीने अंजनी खुर्द येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन व जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदुरीकर महाराज,रमेश अण्णा मुळे,दामू अण्णा शिंगणे,दिलीप शेठ वाघ, रामदास महाराज धांडे, राठीजी व स्टेजवरील उपस्थित सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज,मॉ.जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच सौ.मनिषाताई पवार जिल्हा परिषद अध्यक्ष बुलढाणा, सौ.श्वेताताई महाले आमदार चिखली,सौ.रजनीताई शिंगणे,सौ.पुनम ताई पाटोळे नगराध्यक्षा लोणार,सौ.पुनमताई विजय राठोड जि. प.सभापती, सौ.रेणुकाताई दिलीपराव वाघ जि.प.सदस्य,सौ.निर्मला परदेशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहकर,सौ.संगीताताई गजानन भोकरे मा.पं.स.सभापती,श्रीमती आशाताई झोरे मा.सभापती जि.प. बुलढाणा,ह.भ.प.कु.त्रिवेणी दीदी देशमुख श्रीधाम वृंदावन शेंदुर्जन सौ.शीला अशोकराव खराटे सरपंच अंजनी खुर्द या कर्तुत्ववान महिलांचा मुळे अण्णा व त्यांच्या पत्नी यांनी शाल,श्रीफळ,साडी,व माँ जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

निवृत्ती महाराज
                                        निवृत्ती महाराज

यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना आजच्या महाराष्ट्रातील व समाजातील चालू घडामोडी ची उजळणी वाचून दाखविले.महाराष्ट्रातील 80 टक्के तरुण हा व्यसनाधीन झाला आहे.व या तरुणांनी व्यसनमुक्त झाले पाहिजे.तर गेले दोन ते तीन वर्षापासून होत असलेल्या शैक्षणिक नुकसान भरपाई करण्यासाठी रात्रंदिवस मोबाईलच्या व टीव्हीच्या दूर राहून अभ्यास करायला हवा.तर प्रत्येक गावातील मंदिराचा विकास झाला नाही तरी चालेल परंतु शाळेचा विकास व्हायला हवा शाळेचा विकास झाला तरच आजचा तरुण घडेल असे सुचविले.ते पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात मुलींवर होत असलेले अत्याचार हे दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली.मुलींवरील अत्याचार कमी करायचे असले तर मुलींनी स्वतःप्रामाणिक राहायला हवे.मुली चांगल्या शिकल्या व घडल्या तर स्वतः आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन करू शकतात.तसेचआज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या संखेने वृद्धाश्रमात माता पिता पाठविण्याची कॉम्पिटिशन वाढत आहे सर्वांनी आपल्या आई-वडिलांना घरातच सांभाळून त्यांच्यावर भरभरून प्रेम करावे व त्यांची मनापासून सेवा करावी महाराष्ट्रातील वृद्धाश्रमात माता पिता जाणे बंद झाले तरच या आपल्या शिक्षणाचा फायदा होऊन महाराष्ट्र सुधारला असे समजल्या जाईल असे सुद्धा त्यांनी सांगितले.त्याच बरोबर शेतकऱ्यांनी शेतीसोबतच छोटा मोठा पूरक व्यवसाय करावा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावर होईल आणि शेतीचे उत्पन्न शिल्लक राहिले तरच आताची पिढी जगू शकेल.आणि शेतकऱ्यांनी मुला-मुलींच्या लग्नावर होणारा खर्च टाळून आत्महत्या थांबवाव्या.येणारे दिवस हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुळे अण्णांनी कोरोनाच्या काळात सुद्धा आपला दानशूरपणा दाखवत महाराष्ट्रासाठी व या समाजासाठी ठिक ठिकाणी व वेळोवेळी मदत कार्य करून आत्तापर्यंत चार ते पाच कोटी चे दान केल्यामुळे मुळे अण्णा यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.व असे दानशूर समाजामध्ये फार कमी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमासाठी लोणार मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातून दहा हजार पेक्षा जास्त पब्लिक कार्यक्रमाला आल्याने कार्यक्रम भरगच्च दिसून आला.तर कार्यक्रम संपल्यानंतर दोन ते तीन तास सर्व रोडवरील वाहतूक जाम झालेली पाहावयास मिळाली.रमेश आण्णा मुळे व उध्दव नागरे यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी,परिसरातील बरेच गावकऱ्यांनी व पोलीस प्रशासन यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.