Take a fresh look at your lifestyle.

Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

PM नरेंद्र मोदींची घोषणा

0

नोएडा : तुम्हाला आधार कार्डची (Aadhar Card) माहिती असलीच पाहिजे. यातून बरंच काम सोपं झालं आहे. त्यामुळं लोकांची ओळख तर सोपी झाली आहेच, पण फसवणुकीचे अनेक प्रकारही थांबले आहेत. त्याच्या यशानं प्रोत्साहित होऊन सरकार प्राण्यांचं ‘आधार कार्ड’ही बनवणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झालीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही घोषणा केलीय.

आगामी काळात माणसांप्रमाणं चक्क म्हशींचे (Buffalo) देखील आधार कार्ड काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली असून याबाबतची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ‘पशु आधार’ असं या मोहिमेचं नाव आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळं मदत होईल, असं मोदींचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचं (International Dairy Conference 2022) नुकतंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन झालं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलीय. देशातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जात असून डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केलं जाणार असल्याचंही मोदी म्हणाले. आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे, असं मोदींनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.