गो ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने शाडु शालेय विद्यार्थ्यांची मातीचे गणपती बनविणे स्पर्धा संपन्न
शेगांव :
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे सातत्याने कार्य करून पर्यावरणाचे हीत जोपासणा-या गो ग्रीन फाऊंडेशन संस्थेद्वारा दुसऱ्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविणे स्पर्धेचे दि.२८ ऑगस्ट रोजी श्रीगणेश प्रस्थ येथे भव्य आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर दादा पाटील होते, त्यांनी गो ग्रीन फाऊंडेशनचा सदर उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणारा आहे तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठीही खुप महत्वाचा आहे असे मनोगत या प्रसंगी भाषणातून बोलतांना व्यक्त केले,श्री गणेश प्रस्थ येथे पार पडलेल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला सर्वच शाळांमधील ३५० विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते,यामध्ये अ गट मध्ये इयत्ता ३ री ते ७ वी व ब गट मध्ये ८ वी ते पदवी पर्यत अशी विभागणी करण्यात आली होती,अ गटातील प्रथम बक्षीस मोकासरे अभियंता न.प.याचेकडून शौर्य मंगेश घाटोळ , द्वीतीय बक्षीस मंगलाताई चव्हाण यांचेकडून श्रध्दा देवलाल ढगे तृतीय बक्षीस अमितभाऊ जाधव यांचेकडून स्वामींनी ठाकरे यांना प्रदान करण्यात आले तर ब गटांमधील प्रथम क्रमांकाचे बक्षीस अतीकभाई मेमन यांचे कडून प्रणाली शिवशंकर शेगोकार ,द्वीतीय विजयभाऊ इंगळे यांचेकडून वैष्णवी शेजोळे , तृतीय प्रविण बानोले कडून पवन श्रीकृष्ण गावडे यांना प्रदान करण्यात आले.
सोबतच दोन्ही गटातील नंतरच्या सात स्पर्धकांना गो ग्रीन फाऊंडेशन मार्फत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तथा सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमरभाऊ बोरसे रामदल मित्र मंडळाचे ज्ञानेश्वर गारमोडे , ज्ञानेश्वर साखरे हे आमंत्रित होते तर परीक्षक म्हणून अनंतराव भटकर,जी.के.राठोडसर , डॉ. मोरखडे , प्रशांत गाडोदिया , तरूणांई फाऊंडेशनचे उमाकांत काडेकंर व वानखडे हे उपस्थित होते.