माजी शालेय शिक्षण मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कठोरा शाळेमध्ये विविध उपक्रम संपन्न
विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी लेटरबुक,पेन्सिल साहित्याचे वाटप व शालेय परिसरात वृक्षारोपण
शेगांव :
जि.प.कें.व.म.प्राथमिक शाळेमध्ये माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राजु इंगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेटरबुक,पेन्सिल, पेन आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
शालेय परिसरात कडुलिंब,बदाम,पिंपळ,उबंर, अश्या दीर्घायुष्यी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थ्यांना चाॅकलेटे वाटप करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन गावंडे,दिपक चव्हाण, सचिन वडाळ,सुषमाताई खेडकर,कविता गवळी,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष खवले व शालेय विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद