जि.प.शाळा कठोरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंदाची स्तब्ध राहून आदरांजली
१०१ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या वार्षिक परिक्षेचा निकाल घोषित
शेगांव :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर १०० सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सचिन वडाळ,सुरेश डोसे,अर्जुन गिरी तसेच शाळेतील विद्यार्थीनी आदिती खवले,गौरी जाधव,मनिषा मस्के यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल माहितीपर भाषणातून विस्तृत माहिती सांगितली.

याप्रसंगी संजय महाले,सचिन गावंडे,शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी व शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.