जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन
शेगांव –
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे ‘आजादी का अमृत महोत्सव ‘ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.१० ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर चित्रकला स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बाल कल्पकतेनुसार तिरंगा या विषयाच्या अनुषंगाने चित्राची रेखाटने केली, आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व राष्ट्रध्वजाविषयीची संकल्पना स्पष्ट झाली त्यामुळे बालकांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसुन आला.
शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सचिन वडाळ,अर्जुन गिरी यांनी सदर विद्यार्थ्याचे कौतुक करून चित्रकला स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.