Take a fresh look at your lifestyle.

पंचायत समिती सर्कल अंजनी खुर्द ची निवडणूक लढविण्यास सज्ज

0

लोणार : उध्दव नागरे ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायलयाने फेटाल्यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.यामुळे लोणार तालुक्यात इच्छुक उमेदवारांचे मतदारांसोबत भेटी गाठी वाढल्या आहेत.लोणार पंचायत समिती अंतर्गत अंजनी खुर्द पंचायत समिती सर्कल मधून उध्दव नागरे निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहे.त्यांना कोणताही राजकीय पार्श्वभूमी नाही.

सुरुवातीला एका शाळेवर संगणक शिक्षक म्हणून ५ वर्षे काम केले.आपली नौकरी कायम व्हावी या साठी खूप संघर्ष केला.पण अद्याप तो शासनाचा निर्णय बाकी आहे.त्यानंतर आपण आपल्या भविष्या साठी काहीतरी नौकरी केली पाहिजे या आशेने ग्रामपंचायत महारचिकना येथे संगणक परिचालक म्हणून अल्प मानधनावर काम करत आहे.

ग्रामपंचायत मध्ये काम करत असतांना जनतेचे कामे करून देणे.त्यांना मिळणाऱ्या शासनच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविणे हि कामे करत आहे.पण आपण कुठेतरी जनतेच्या कामी पडावे या लोकांची कामे करावी या हेतूने परिसरातील गावातील नागरिकांचे तहसील ची कामे असो वा पंचायत समिती मध्ये प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे.आता उध्दव नागरे यांनी अंजनी खुर्द पंचायत समिती सर्कल मधून निवडणूक लढविण्याची ठरवलेली आहे.आता पासूनच परिसरातील गावातील मतदारांच्या भेटी घेणे,सामाजिक कार्यात उपस्थित राहणे,लग्न कार्यात सहभागी होणे हि कामे सध्या करत आहे.

उध्दव नागरे एक सामान्य युवक प्रस्थापित विरुद्ध निवडणूक लढवणार असून जनतेने त्यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे व उध्दव नागरे यांनी सर्कल मधील विकास कामे व जनतेच्या प्रश्नाची पुढील २५ वर्षाचे नियोजन केले आहे.त्यातच शेतकऱ्यांचे प्रश्न असेल,युवकांचे प्रश्न असेल सर्व सोडविण्यसाठी कटीबद्ध आहे.त्यामुळे मतदारांनी माझ्या वर विश्वास ठेऊन मला निवडून द्यावे असे उध्दव नागरे यांनी आवाहन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.