रमजान ईदपूर्वी वेतन व सण उत्सव अग्रीम रक्कम अदा करा
प्रहार शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
माहे मार्च पासुन प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडलेले असुन ३ एप्रिलपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे,३ मे रोजी रमजान ईद होणे अपेक्षित आहे.
शिक्षक मार्चच्या वेतनापासून वंचित असून एप्रिल महिनाही संपत आलेला आहे, उर्दु माध्यम शिक्षकांची रमजान ईद अंधारात जाऊ नये म्हणून पवित्र रमजान ईदनिमित्त एप्रिलचे वेतन ईदपूर्वी २ मेला अदा करण्यात यावे. पवित्र रमजान महिना व ईद निमित्त मुस्लीम बांधवांना बरीचशी खरेदी व तयारीसाठी पैशांची गरज असते. सणाच्या वेळी शिक्षकांना आर्थिक त्रास होऊ नये, यासाठी मार्च महिन्याचे वेतन व सण उत्सव अग्रीम रक्कम त्वरित आणि एप्रिलचे वेतन ईदपूर्वी अदा करावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी किशोर पागोरे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे सतिष देशमुख गटविकास अधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनावर प्रहार शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन वडाळ,अर्जुन गिरी,अनिल खेडकर, श्रीकृष्ण न्याहाटकर,सचिन गावंडे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.
गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट व चिटणिस श्रीकृष्ण न्याहाटकर