सातवा वेतन आयोग थकबाकी फरकाचा दुसरा हप्ता अदा करा
प्रहार शिक्षक संघटनेची गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
डिसीपीएसधारक शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकी रक्कमेच्या फरकाचा दुसरा हप्ता अदा करण्यासंदर्भात अनुदान तरतुद प्राप्त झालेली असुन सदर थकबाकीची रक्कम डिसीपीएसधारक शिक्षकांना तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी गटविकास अधिकारी सतिष देशमुख व गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.
सदर विषयावर चर्चा केली असता सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांनी दिले,चर्चेदरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके गजानन गायकवाड,केंद्रप्रमुख इंदुमती डाबेराव, सु.वा.इंगळे यांची उपस्थिती होती.

प्रहार शिक्षक संघटनेचे सचिन वडाळ,दिलीप भोपसे,अनिल खेडकर, विजय टापरे,प्रशांत नागे,राहूल वैराळकर, विनोद डाबेराव,रजनी धारपवार, सुषमा खेडकर आदी पदाधिका-यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या असुन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी अंनतराव वानखडे,प्रभाकर ढोके,संकेत जोशी,प्रदिप डाबेराव तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.