Take a fresh look at your lifestyle.

जिद्द आणि चिकाटीमुळे पहिल्याच प्रयत्नात निखिल तांदळे झाला युको बॅकेचा आय.टी.ऑफिसर्स

0

शेगांव :
भारतीय राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरी प्राप्त होणे हे आज प्रतिष्ठेचे समजण्यात येत आहे.युको बँक ही राष्ट्रीयकृत बँक असुन या बँकेचे मुख्यालय कलकत्ता येथे आहे.यूपीएससी, एमपीएससी व अथवा अन्य स्पर्धा परीक्षेनंतर बँकेमध्ये अधिकारी होण्याची युवकांमध्ये आजही क्रेझ कायम आहे.
संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले व स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी पात्र ठरत असतात.बँकेमध्ये अधिकारी व्हायचे या ध्येयाने प्रेरित होऊन जिद्द व चिकाटीच्या प्रयत्नाने जि.प.कन्या शाळा पहुरजिरा येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक अध्यापक सुनिल तांदळे यांचे सुपुत्र निखिल सुनिल तांदळे याने बॅकच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याची राष्ट्रीयीकृत युको बॅकेमध्ये आय.टी.ऑफिसर्स पदी निवड झालेली आहे.
त्याच्या या यशाबद्दल प्रहार शिक्षक संघटना व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत झनके,जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी अंनतराव वानखडे,विनोद खवले,राधाकृष्ण तालोट,रमेश कडू,दिपक अकोटकार, प्रविण कात्रे,कचरू चव्हाण,नंदू ढाकरे,विरोचन जाधव आदी पदाधिकारी होते.

प्रहार व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने निखिल तांदळे याचा सत्कार करतांना संघटनेचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.