Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल चोरी प्रकरण -सहा महिन्यांपासून सुरु आहे चोरीचा प्रयत्न

Crime News Sataranews- लोणी - मिरज जाणारी हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईप लाईन सहा महिन्यापूर्वी बिबी - घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा फक्त दोन कि. मी. अंतरावर पाइपला होल पाडून समांतर पाईप टाकून चोरीचा प्रयत्न झाल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर अन्य काही जणांचे सहकार्य असल्याची शंका व्यक्त होत आहे.

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आदर्की /सातारा : लोणी – मिरज जाणारी हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईप लाईन सहा महिन्यापूर्वी बिबी – घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा फक्त दोन कि. मी. अंतरावर पाइपला होल पाडून समांतर पाईप टाकून चोरीचा प्रयत्न झाल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर अन्य काही जणांचे सहकार्य असल्याची शंका व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची लोणी ते मिरज पर्यंत पेट्रोल पाइपलाइन टाकण्याचे काम १५ वर्षापूर्वी झाले. त्यावेळी जलदगतीने काम करताना पाइपलाइन जमिनीत पाच ते सात फुटापर्यंत खोल गाडली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जामिनी ताब्यात घेतल्या आहेत. पण, जमिनीच्या मध्यभागातून पाईप गेल्याने शेतकरी मशागत करुन पिकांची पेरणी करतात.

त्याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन सासवड ( झणझणे ) ता . फलटण येथे पाईपलाईनला होल पाडून संमातर पाइपलाइन टाकून चोरीचा प्रयत्न केला. परंतू व्हॉल्व्हला गळती लागून पेट्रोल जमिनीत मुरुन विहिरीत उतरल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हजारो लिटर पेट्रोल शेतात वाहून विहिरीत पाझरले. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचर प्राण्यांचा विहिरीत मृत्यू होऊन मासे , बेडकांचा खच पडला आहे. त्यामुळे शेतकरी, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

या घटनेची नोंद पोलीसात झाली आहे. याच पेट्रोल पाईपलाईनला बिबी गावच्या हद्दीत पाझर तलावाखाली वेडया बाभळीच्या बुंध्याखालून अंदाजे १० ते १५ फूट भुयार खोदकाम करुन पाईपलाईन फोडण्या प्रकार अगोदरच उघड झाल्याने चोरीचा प्रकार झाला नाही अशी नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे.

पाइपलाइनला होल पाडूनही कंपनीला पत्ताच नाही पेट्रोल पाईपलाईन शेजारी खुदाई किंवा पाईपलाईन शेजारच्या झाडाच्या फांद्या तोडल्या तरी अलार्म वाजतो व संबधीत ठिकाणी यंत्रणा पोचते मग पाईपलाईनला होल पाडून संमातर पाईप टाकली. ती ही जमिनीखाली चार ते पाच फूट खोल. मग अलार्म का वाजला नाही याचा शोध घेतला पाहिजे.

सहा महिन्यात दोन वेळा चोरीचा प्रयत्न या पाइपलाइनमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न दोन वेळा झाला आहे. तरी देखील दोन्ही वेळेस पोलीस स्टेशनला अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली नाही. यापूर्वीच ही माहिती मिळाली असती तर दुसरा प्रयत्न झाला नसता.

[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.