Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या आईने घेतली लस; पात्र नागरिकांनी लस घेण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन

लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरू झाला आहे

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केले की त्यांच्या आई हीराबेन मोदी यांना कोविड -१९ लसीचा पहिला डोस मिळाला आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. पात्र नागरिकांनी पुढे येऊन कोविड -१९ लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“माझ्या आईने आज कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतला हे ऐकून मला आनंद झाला आहे. “लस घेण्यास पात्र असलेल्या आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करण्यास व प्रेरणा देण्यास मी सर्वांना उद्युक्त करतो,” असे पंतप्रधानांनी ट्विट केले.

पंतप्रधानांच्या आईला कोविड -१९ लसीचा पहिला डोस लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याअंर्तगत मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक (६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील) आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना सहव्याधी आहेत अशांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात येणार होती. दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरू झाला आहे.

दुसऱ्या टप्प्यात १ मार्च रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे सकाळी पंतप्रधान मोदी यांना कोविड -१९ लसीचा प्रथम डोस देण्यात आला. पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचा डोस घेतला, जो भारत बायोटेकने स्वदेशी विकसित केला आहे.

भारत जानेवारी १६, २०२१ पासून दोन कोव्हीड -१९ लस देत आहे – कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देशात कोविशील्डची निर्मिती केली जात आहे.

 

 

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.