शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहारची टीम धडकली थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात
समस्या निकाली न निघाल्यास राज्याध्यक्ष महेश ठाकरे व विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी निवेदनामार्फत दिला तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
शेगांव :
अमरावती विभाग अंतर्गत असलेल्या अमरावती,अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांबाबत काल प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात अमरावती,अकोला,बुलढाणा,यवतमाळ व वाशीम या पाचही जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांना निवेदन देण्यात आले.अमरावती विभागातील कार्यरत शिक्षकांच्या समस्येविषयी चर्चा करण्यात आली. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यालय प्रमुखांना लवकरच समस्या निकाली काढण्याचे निर्देश देण्यात येतील असे संघटनेला आश्वासित केले आहे,शिक्षकांच्या समस्या निकाली न निघाल्यास प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी दिला आहे.

याप्रसंगी बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,सररचिटणीस देवीदास बडगे, जिल्हाध्यक्ष शरद काळे,अकोल्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश टीकार,यवतमाळचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे, वाशिम जिल्हाध्यक्ष महादेव ठाकरे , अमरावती जिल्हा सरचिटणीस अमोल वऱ्हेकर, जिल्हा कार्याध्यक्ष नागसेन रामटेके, जिल्हा संघटक दिलीप इंगळे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख निलेश रसे ,जिल्हा कोषाध्यक्ष अमोल पंडित, जिल्हा सहसचिव अनुप डीके,पंकज ठाकूर,सारंग धामणकर,शेगांव तालुकाध्यक्ष सुनिल घावट, अचलपूर तालुका अध्यक्ष रमेश कडू, धामणगाव अध्यक्ष किरण वानखडे,अमोल हिरुळकर,तुकाराम सांगळे आदी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह निलेश हाडोळे,राहुल बिंड,हरीश राणे,भारत रामटेके,शुभांगी खोलापुरे आदि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.