सगोडा येथे शाळापुर्व तयारी अभियान प्रशिक्षण संपन्न
शेगांव :
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) बुलडाणा, गटसाधन केंद्र शेगांव यांच्यावतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सगोडा येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी एन.डी खरात,विषय तज्ञ रमेश वानखडे,केंद्रप्रमुख जी.डी.गवई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
नविन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणा-या मुलांची शाळापूर्व तयारी होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेण्यात आले.सचिन गावंडे व प्रमोद इंगळे या दोन तज्ञ शिक्षकांनी केंद्राअंतर्गत १ ते ५ च्या इयत्ताना शिकविणा-या शिक्षकांना व अंगणवाडी सेविकांना सदर प्रशिक्षण दिले आहे.
आगामी काळात हा उपक्रम तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार आहे,या उपक्रमा अंतर्गत शाळेत दाखलपात्र मुले व पालक यांचे दोन मेळावे शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या मेळाव्यात दाखल पात्र मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत याची नोंद कृतींच्या सहाय्याने घेतली जाणार आहे. ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेशन करणार आहेत. तसेच दुस-या मेळाव्या पर्यंतच्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.
सगोडा येथील प्रशिक्षणाच्या वेळी उपस्थित शिक्षकांनी प्रभातफेरी तसेच समुपदेशन, शारिरीक विकास,बौद्धिक विकास व सामाजिक आणि भावनात्मक विकास आदी विषयांवरील स्टॉल मांडून या उपक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली.
याप्रसंगी उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे,सचिन वडाळ,अर्जुन गिरी,अंनतराव वानखडे,ज्ञानदेव भांबेरे,मनोहर उबंरकर,विरोचन जाधव,दिलीप भोपसे,ज्ञानेश्वर ताठे,जीवन ढोलवाडे,गणेश अढावू,मिनाक्षीताई जुनघरे,संजय लंके,अन्नपुर्णाताई अंभोरे,गणपत राठोड, राजेश बावणे,उमाताई रामटेके,अंगणवाडी सेविका जया खवले,रत्नमाला बेद्रे,जया सावळे,सुजाता चोपडे, राजश्री अहिर,मिना खोडे,ललिता मिरगे,मिरा मिरगे,उषा देठे आदींची उपस्थिती होती.
प्रशिक्षण दरम्यान सगोडा शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक शामकुमार डाबेराव, माणिकराव देशमुख, विष्णू घोगले,प्रफुल्ल भोंडे,नंदकिशोर ढाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले.