प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने आरोग्य विषयक विविध कार्यक्रम संपन्न
शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोंनगाव अंतर्गत असलेल्या उपकेंद्र टाकळी विरो येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्याने आरोग्य विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हिवताप आजारचा प्रसार करणा ऱ्या डासांची माहिती, हिवतापाची लक्षणे व टी.बी. मुक्त भारतची शपथ देऊन टि.बी या आजारची लक्षणे व निदान आदी आरोग्य विषयाच्या संदर्भात माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

याप्रसंगी डाॅ.खोटोडमॅडम यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी आरोग्य सेवक सरोदे,श्रीमती ढोके, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.