Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायत निवडणूक कामातून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे.

जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची निवेदनामार्फत मागणी

0

शेगांव :
जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असुन सदर निवडणूक कामातून मुख्याध्यापक यांना वगळण्यात यावे अशी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी मागणी केली आहे.

मुख्याध्यापक हा शाळेचा प्रशासकीय दुवा व शालेय कामकाजाचा महत्त्व घटक आहे,मुख्याध्यापकांना वेळोवेळी शालेय संदर्भात प्रशासकीय माहितीचे अहवाल द्यावे लागतात तसेच शालेय शैक्षणिक जबाबदारी व इतर कामकाज मुख्याध्यापक करत असतात,मुख्याध्यापकांना निवडणूक कामाची जबाबदारी दिली तर शालेय व्यवस्थापन व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मुख्याध्यापकांना ग्रामपंचायत निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्यात यावे अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांना निवेदन सादर करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी

सदर निवेदनावर प्रहार शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन वडाळ,केंद्रसमन्वयक सचिन गावंडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी आदीच्या स्वाक्ष-या असुन निवेदनाच्या प्रतिलिपी गटविकास अधिकारी सतिष देशमुख,गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांना सादर करण्यात आलेल्या आहेत.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे अर्जुन गिरी,विजय सपकाळ शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद इंगळे व आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.