Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे पक्षाने तिकीट ने दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक

0

उध्दव नागरे
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकां कडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप या पक्षाने काल उमेदवारांची यादी जाहीर करून मुंडे समर्थक यांना धक्काच दिला आहे.लोकनेते पंकजाताई मुंडे यांचे नाव सर्वात आधी विधानपरिषद तिकीट साठी होते. पण पक्षाने वेळेवर पंकजाताई मुंडे यांचे नाव कट करून मुंडे समर्थकांना कमालीचा धक्का दिलेला आहे.त्याचे पडसाद राज्यभर मुंडे समर्थकांमध्ये दिसून येत आहे. मुंडे समर्थकांनी जळगावला यासंदर्भात भाजप पक्षाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. तसेच औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा मुंडे समर्थकांनी पक्ष कार्यालयांवर आंदोलन केले. त्याच बरोबर लोणार तालुक्यातील मुंडे समर्थक सुद्धा कमालीचे नाराज झाले असून ज्या भाजप पक्षाच्या मुंडे महाजन यांनी पक्ष तळा घरात, गावागावात, वाड्या-वस्त्यांवर पोहोचवला ,त्याच मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना वारंवार भाजप पक्ष राजकारणात डावलण्याचे काम करीत आहे.दोन विधान परिषद व दोन राज्यसभा उमेदवारी मध्ये नाव सर्वात आघाडीवर असून सुद्धा पंकजा ताईंना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला .तरी सुद्धा मुंडे समर्थकांचा गट हा वाढतच गेला.20 जून रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदे च्या निवडणुकांमध्ये सुद्धा पंकजाताई मुंडे यांचे नाव आघाडीवर असून सुद्धा पक्षाने ऐन वेळेवर पंकजाताईचे उमेदवारी काटलेली आहे. यामुळे लोणार तालुक्यातील मुंडे समर्थकांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतलेली आहे. पंकजा ताई जोपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत मुंडे समर्थक शांत आहे. आणि या शांतीचा उद्रेक होऊ नये म्हणून, भाजपने पंकजाताई मुंडे यांना संधी देऊन न्याय देण्याचे काम करावं . समस्त वंजारी समाज नव्हे तर ओबीसी समाजाचे सुद्धा पंकजा ताई नेतृत्व करतात आणि अशा वेळी जर भाजप त्यांना राजकारणात डावलण्याचा प्रयत्न वारंवार करत असेल तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंडे समर्थक भाजपला आपली जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मुंडे समर्थक उद्धव नागरे व संतोष घुले यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.