वन्य प्राण्यापासून पिकांना संरक्षण द्या, संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार यांना निवेदन द्वारे मागणी
लोणार तालुक्यात वन्य प्राणी रोही,हरीण,रानडुक्कर यांनी घातला हैदोस
लोणार तालुक्यात वन्य प्राणी रोही,हरीण,रानडुक्कर यांनी हैदोस घातला आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके जागवण्यासाठी शेतात रात्र जगून काढावी लागत आहे.सध्या पिके जोमात असून त्यांना वाचवण्यासाठी सध्या शेतकरी धडपडत आहे.आज लोणार तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी लोणार तहसिलदार यांना निवेदन दिले आहे की, शासनाने वण्य प्राणी रोही या प्राण्याचा बंदोबस्त करावा.मागेल त्याला 100% अनुदानावर कुंपण देण्यासाठी योजना करावी. ज्या जमिनी वनविभागाच्या हद्दीला लागून आहे तेथे वनविभाग व कृषी विभाग यांनी 10 फूट खोल व 12 फूट रुंद नाली खोदून तारेचे समांतर कुंपण करावे.नुकसान भरपाई ची किचकट प्रक्रिया सोपी करावी. वन विभाग व कृषी विभाग च्या कर्मचाऱ्यांना गावात राहणे अनिवार्य करावे.
शासन जो पर्यंत उपयोजना करत नाही तो पर्यंत शासनाने शेतकरी त्यांना मानधन तत्वावर नेमावे. व वन्य प्राण्यांचा हल्ल्यात एखाद्या शेतकऱ्या कडून प्राण्यांना इजा झाल्यास त्या शेतकऱ्याला संरक्षण म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करू नये.
या मागण्यासाठी आज तहसिल दार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी अॅड.शिवाजी सानप, डॉ.रवींद्र दराडे,उध्दव नागरे,बद्रीनाथ कांगणे,सुभाष कांगणे,पंढरी सानप, सुदाम चव्हाण, राम कायंदे, विठ्ठल नागरे, रामेश्वर कायंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.