राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनासाठी कमी पडलेला अपुरा निधी उपलब्ध करून द्या
प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांची निवेदनामार्फत मागणी
बुलडाणा :
राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाबाबत घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यातील एकोणीस जिल्ह्यात दिवाळीपुर्वी अदा करण्याच्या माहे ऑक्टोबर वेतनासाठी तरतूद कमी प्राप्त झालेली आहे,दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची घोषणा शासनाने केलेली होती,मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्यापही शिक्षकांचे वेतन झालेले नाही ही बाब गंभीर असुन वेतन न झाल्याने शिक्षकांनी घेतलेल्या गृहकर्ज, बँका,पतसंस्था आदी कर्जाचा शिक्षकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात निधी अपुरा पडलेला आहे याबाबत शासनस्तरावरून माहिती घेऊन संबंधित जिल्हयांना अपुरा पडलेला निधी त्वरित उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वेतन तरतुद उपलब्ध करून दिल्यानंतरच शिक्षकांच्या माहे ऑक्टोबरचे वेतन होण्याचा मार्ग सुकर होईल,तरी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिवाळीच्या वेतनासाठी कमी पडलेला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,शालेय शिक्षण मंत्री,ना. दीपकजी केसरकर यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी केली आहे.
जिल्हा परिषद,
प्रहार शिक्षक संघटना,
महेश ठाकरे,
अपुरा निधी,
बुलडाणा