झाडांची पूजा करत वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थीनींनी बांधल्या झाडाला राख्या
शेगांव :
भाऊ-बहिणीच्या ऋणानुबंधांना आणखी घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा असुन पर स्त्री बहिनीसमान समजुन तिचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे हा संस्कार रूजावा या हेतूने जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे विविध उपक्रमांद्वारे रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींनी शिक्षकांना,विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधली व झाडांना सुध्दा राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
या आगळ्या कार्यक्रमातून शिक्षक व मुलांमधील प्रेम,आपलेपणाची भावना दिसून आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी व शिक्षकांनी रक्षाबंधन सणाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले,तसेच बंधुत्वाचे नाते कायम जोपासण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सुषमा खेडकर, सचिन गावंडे,दिपक चव्हाण उपस्थित होते.