Take a fresh look at your lifestyle.

Pune : चंदन चोरी करणाऱ्या ‘पुष्पा’ गँगच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या

0

पुणे : चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा टोळीच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यस आले आहे. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30) आणि रामदास शहाजी माने (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गँग ने पुणे शहरातील दत्तवाडी, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी उत्तम नगर या भागात चोरी केल्याचे तपासातून समोर आलं आहे. एनडीए आणि सहकार नगर परिसरात एका शाळेच्या आवारात झालेल्या चंदन चोरीचा तपासादरम्यान यातील एकाला अटक झाली होती.

चोरलेले चंदनाचे झाड त्याने दुसऱ्यांना विकले होते. यानंतर उत्तम नगर परिसरातील चंदन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यातील आरोपींकडे विचारपूस केली असता सर्व आरोपी सिंहगड रस्त्यावर थांबले असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.