Take a fresh look at your lifestyle.

पुणे : धरणक्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी; पाणीसाठा ७२ टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाला आहे

0

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (मंगळवार) सकाळपर्यंत धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २१.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) ७२.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात सहा मि.मी, पानशेत धरण परिसरात पाच मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघा दोन मि.मी. पाऊस पडला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २१.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत २१.०३ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत आज (मंगळवार) सकाळी ०.१२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

धरणातून पाण्याचा विसर्ग तूर्त थांबविण्यात आला –

दरम्यान, खडकवासला धरणातून तूर्त पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   २.२२      ५९.९५
वरसगाव               ९.०२     ७०.३८
पानशेत                 ८.१२      ७६.३१
खडकवासला        १.७८      ९०.३९
एकूण                   २१.१५     ७२.५७

Leave A Reply

Your email address will not be published.