जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जि.प.कें.उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय कठोरा येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले,प्रास्ताविक भाषणातून उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व आदि शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडीतील व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक,अंगणवाडी कर्मचारी,बचत गटाचे सदस्य व शालेय विद्यार्थ्याची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुरेश डोसे यांनी केले.