Take a fresh look at your lifestyle.

शाळेच्या विविध समस्या सोडविण्याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

0

बुलडाणा
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या भौतिक गरजा भागविणे ,विद्युत देयके अदा करणे,शालेय स्टेशनरी साहित्य खरेदी करणे आदी बाबी करिता शाळेला शासनस्तरावरून संयुक्त अनुदान अदा करण्यात येते परंतू या शैक्षणिक सत्रामध्ये मुख्याध्यापकांना तीस टक्के रक्कम अदा करण्यात आलेली असुन उर्वरित सत्तर टक्के रक्कम जिल्हास्तरावर समायोजित करण्यात आलेली आहे.सदर समायोजित करण्यात आलेली सत्तर टक्के रक्कम मुख्याध्यापकांना अदा करण्यात यावी,जिल्हा परिषदेचे विनियोग निर्धारण न झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे चार टक्के सादिल अनुदानाची रक्कम गत दोन वर्षापासून प्राप्त झालेली नाही तरी जिल्हा परिषदेचे विनीयोग निर्धारण शासन स्तरावरून पुर्ण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे व मुख्याध्यापकांना सादिल अनुदान अदा करण्यात यावे,जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त खोल्या दुरूस्तीचे प्रस्ताव विनाविलंब होण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्त कार्यालयाऐवजी जिल्हा परिषदेमार्फत शिकस्त खोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुर करण्यात यावे,जिल्हा परिषद शाळांना मुला व मुलींसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह व हॅडवाश स्टेशन उपलब्ध करून देण्यात यावे,बुलढाणा मुख्यालय येथे शिक्षकांसाठी शिक्षक भवन मंजूर करण्यात यावे अशी मागणी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल गवते यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर वाघ,श्रीराम भुते,विलास चव्हाण,शिवदास टेकाळे ,संजय सोनुने,शहा,दत्ता क्षीरसागर,राधेश्याम कोल्हे यांनी निवेदनामार्फत केली आहे.

याप्रसंगी मुख्याध्यापकांच्या व शाळेच्या विविध समस्या सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा केली असता लवकरात लवकर संपुर्ण समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहे.

शाळेच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन देतांना संघटनेचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.