Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील शाळा पुर्ववत सुरू करा

0

शेगांव : 
जिल्हयातील इयत्ता १ ते ८ पर्यत ऑफलाईन अध्यापन बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलडाणा यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा पुनर्विचार करून शाळा पुर्ववत सुरू करणेबाबत जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदनामार्फत मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार समाधान सोनवणे यांना शाळा पुर्ववत सुरू करण्यासंदर्भात निवेदनामार्फत मागणी करतांना तालुकाध्यक्ष व पदाधिकारी

जिल्हयातील शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये असणाऱ्या इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शासकीय , निमशासकीय व खाजगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळेमध्ये ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणारे वर्ग पुर्णपणे बंद झालेले असुन फक्त ऑनलाईन शिक्षणास मुभा देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणास अनेक तांत्रिक अडचणी असुन ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ अद्यावत मोबाईल नसणे,मोबाईलची रेंज नसणे,एकाच कुटुंबात वेगवेगळ्या इयत्तेत शिकत असणारे विद्यार्थी असणे अश्या अनेक अडचणी आहेत.त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन अध्यापन व अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी प्रभावी ठरत आहे.

ज्या भागात कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव नाही अश्या भागातील कोरोना संसर्ग नियमावलीचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्यापन कार्य करण्यासाठी ऑफलाईन शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यासंदर्भातील निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बुलडाणा,मुख्यकार्यपालन अधिकारी बुलडाणा,तहसीलदार समाधान सोनवणे,तहसील कार्यालय शेगांव,शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद बुलडाणा,गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात,पंचायत समिती शेगांव यांना देण्यात आलेल्या आहेत.

गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांना शाळा पुर्ववत सुरू करण्यासंदर्भात निवेदनामार्फत मागणी करतांना तालुकाध्यक्ष व पदाधिकारी

सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष सुनिल घावट,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी,कार्याध्यक्ष सचिन वडाळ,सरचिटणीस अनिल खेडकर,
उपाध्यक्ष दिलीप बोपसे,विनोद डाबेराव,रजनी धारपवार,महिला संघटक सुषमा खेडकर,सहसंघटक राहूल वैराळकर,केंद्र समन्वयक सचिन गावंडे,अर्जुन गिरी आदी पदाधिका-याच्या स्वाक्ष-या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.