Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्ती निमित्त पोलीस उपनिरीक्षक अरूण किरडे यांचा सत्कार निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

0

शेगांव : 
पोलीस विभागात ३९ वर्ष सेवाकाळ पुर्ण करून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक अरूण किरडे यांचा स्वगृही समाज बांधवांच्यावतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करून शाल,पुष्पगुच्छ श्रीफळ व रामायण रचयिता ऋषी महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक बाबुराव उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील व सोनवणे,विजय टापरे आदीच्या प्रमुख उपस्थिती सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे संचालन राधाकृष्ण तालोट तर आभार प्रदर्शन सुनिल घावट यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दिलीप भोपसे,रमेश कडू,सतीश घावट आदीनी अथक परिश्रम घेतले.

याप्रसंगी अनिल खेडकर,गजानन खोडके,राजेंद्र शेंद्रे, पाटकर,ठाकरे,भवर,इंगळे, घुये,सुरळकार,सोनोने, डांगरे, मुकूंदे, भांडे,आडे, बुटे, इंगळे,मोरे,बुध,आदी बहुसंख्येने समाज बांधव व महिलांची उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.