Take a fresh look at your lifestyle.

जळगावातील रस्ते होणार आता खड्डेमुक्त

जळगाव : जळगाव महापालिकेने शहरातील विविध विकास कामांसाठी ४२ कोटी रूपये निधीच्या ५९ कामांचा प्रस्ताव दिला होता.

0

जळगाव : जळगाव महापालिकेने शहरातील विविध विकास कामांसाठी ४२ कोटी रूपये निधीच्या ५९ कामांचा प्रस्ताव दिला होता. शासनाच्या नगरविकास विभागाने या कामांना मंजूरी दिली आहे. यात बहुतांश कामे ही मुख्य रस्त्यांची आहेत, त्यामुळे आता शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील असे सांगण्यात येत आहे.

जळगाव शहरातील रस्त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले होते. कोणत्याही भागात गेले तरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे वाहनधारकांना कठीण झाले आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, आता खड्ड्यांपासून जळगावकरांची सुटका होणार आहे.

४२ कोटीचा प्रस्ताव जळगाव शहरातील रस्त्यातील खड्डे दुरूस्तीसह विविध विकासकामांचा ४२ कोटी रूपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या निधीतील कामाबाबत आक्षेप घेण्यात आल्यामुळे शासनाने या निधीच्या कामाला ‘स्टे’दिला होता.

त्रीसदस्यीय समिती शासनाकडून येणाऱ्या ४२ कोटीच्या निधीतून कोणती कामे घेण्यात यावी, यासाठी नगरविकास मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची त्रीसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने एकूण ५९ कामे सूचविली. त्यात सर्वाधिक कामे ही रस्त्यांची आहेत. चेन फेन्सींग, नालीवर ढापे टाकणे आदी कामे यातून रद्द करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.