Take a fresh look at your lifestyle.

धम्म परिषदेमध्ये साहेबराव तायडे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणाच्या वतीने दि.१ एप्रिल रोजी मोताळा येथे धम्म परिषद संपन्न झाली

0

मोताळा :
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणाच्या वतीने दि.१ एप्रिल रोजी मोताळा येथे धम्म परिषद संपन्न झाली, या धम्म परिषदेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या हस्ते सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशावर कार्यरत असलेले साहेबराव तायडे यांचा भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
साहेबरावजी तायडे हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात .सर्वांच्या सुखदुःखात ते सदैव सहभागी असतात. गोरगरिबांसाठी ते नेहमी मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या कार्याची पावतीच जणू या पुरस्काराने त्यांना मिळाली आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबददल पंचक्रोशीतील समस्त जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

धम्म परिषदेमध्ये साहेबराव तायडे यांचा समाजरत्न पुरस्कार प्रदान करून यथोचित सन्मान करतांना मंचकावर उपस्थित असलेले मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.