Take a fresh look at your lifestyle.

सलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर म्हणाला…

विकेंडचा वार या एपिसोडमध्ये हे घडले आहे.

0

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरु असून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसत आहे. शोमध्ये विकेंड एपिसोडचा वार एपिसोडमध्ये सलमान स्पर्धकांना त्यांच्या चुका सांगताना दिसतो. तसेच अनेकदा त्यांना सुनावत देखील असतो. भाईजानने करण कुंद्रा, उमर रियाज आणि अभिजीत बिचुकले यांना फटकारले आहे. इतकच काय तर घरातून बाहेर काढून टाकेन असे देखील म्हटले आहे.

बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या टास्कमध्ये अभिजीत बिचुकलेने देवोलीना आणि प्रतीक सहजपाल यांना अपशब्द वापरले. त्यावर बोलताना सलमान म्हणाला, ‘तुझ्या घरातल्यांना कुणी शिवीगाळ केली तर तुला कसे वाटेल? मी तुला शेवटचे बजावतो. आठवड्याच्या मध्येच येऊन घरात घुसून तुझे केस पकडून तुला घराबाहेर काढेन. नाही तर घरात घुसून मारेन.’ त्यानंतर बिचुकले लिविंग एरियामधून उठून एक्झिट गेटकडे जाताना दिसतो.

‘खड्यात गेला शो, मला अशा शोमध्ये थांबायचे नाही. दरवाजा उघडा’ असे बिचुकले बोलताना दिसत आहे. दरम्यान, सलमान खान करण कुंद्राला देखील खडेबोल सुनावताना दिसतो. तेजस्वीला टास्कमध्ये पाठिंबा न दिल्यामुळे त्याने करणवर संताप व्यक्त केला आहे.

 

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.