Take a fresh look at your lifestyle.

सारखं तोंड येतय? घरच्या घरी करून बघा हे उपाय मिनिटात तोंड होईल गायब

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अति मसालेदार किंवा दातांची निगा नाही राखल्यास, पोट साफ न झाल्यास किंवा अनेक कारणांमुळे तोंड येते. यावर आज आपण घरगुती आणि सोपे उपाय पाहुयात.

पाण्यामध्ये मध टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.

जाईची ५-६ पाने स्वच्छ धुवून चघळावीत. जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे. असे दिवसातून ३-४ वेळा, या प्रमाणे ४-५ दिवस करावे.

पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि तोंड बरे होते.

तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होते.

हळद पाण्यात मिक्स करुन पाणी गाळून घेणे आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. किंवा हळद लावण्याने व्रण लवकर भरुन येतो.

काही जणांच्या बाबतीत वारंवार तोंड येण्याचा त्रास असल्यास त्यामागे बध्दकोष्ठाचा त्रास असण्याची शक्यता असते, अशांना संध्याकाळच्या

जेवणानंतर तूप (पाच-सहा चमचे) खायला द्यावे. त्यानंतर लगेच एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाव्याचा मगज (दीड ग्रॅम) घेण्याचा सल्ला द्यावा. यामुळे पहाटे पोट साफ होते.

वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावल्यास आराम मिळतो.

धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून थोडसे गार झाल्यावर गुळण्या कराव्यात.

तोंड येणा-या व्यक्तींनी तिखट, अतिखारट व आंबलेले अन्नपदार्थ टाळावेत.

-निवास उद्धव गायकवाड

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.