संजय सुरडकर यांची प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल विविध शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले संजय सुरडकर यांची पंचायत समिती खामगाव येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल विविध शिक्षक संघटनेच्यावतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षण विभागात शिक्षकांच्या प्रशासकीय समस्या निकाली काढणे, शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्याचा तात्काळ निपटारा करणे,संघटनेच्या मागण्याची दखल घेऊन प्रलंबित समस्या सोडविणे अशी त्यांची शिक्षण विभागातील कारकीर्द झालेली आहे.
त्यांच्या या प्रशासकीय कामाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील प्रशासकीय वाटचालीकरिता संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद इंगळे,विजय टापरे,प्रशांत नागे आदी पदाधिका-यांची उपस्थिती होती.