Take a fresh look at your lifestyle.

वझर आघाव येथे वंचित च्या नेत्या सविताताई मुंडे यांनी केला रक्षा बंधन साजरा

लोणार

0

लोणार : वंचित च्या नेत्या, तसेच वंजारी सेवा संघाच्या महिला कार्याध्यक्ष सविता मुंडे यांनी यांनी वझर आघाव येथे आज भेट दिली. ताईंचे स्वागत करण्यासाठी वंचित आघाडी लोणार चे महासचिव बळी मोरे, व डॉ.केशव अाघाव ,ग्रामपंचायत सदस्य यांनी ताईंचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळी मोरे यांनी केले. सविता ताई यांनी सर्व समाजबांधवां सोबत राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.सविता मुंडे यांनी वझर येथील नागरिकांना संबोधित करताना गेल्या 2019 च्या विधान सभा निवडणूक प्रचाराच्या वेळी येण्याचा योग नाही, ती खंत मनाला होती.

विधानसभा निवडणूक झाल्यावर येणार होत्या पण कोरोना महामारी मुळे येऊ शकले नाही,पण आज गावात येण्याचा योग आला. गावातील समस्या सोडविण्यासाठी मला केव्हाही हाक मारा मी तुमच्या सोबत राहील असा विश्वास या वेळेस ताईंनी दिला. वझर आघाव येथील नागरिकांनी केलेल्या स्वागता मुळे भारावून गेल्या.

याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव नागरे तर आभार प्रदर्शन वैभव आघाव यांनी केलं.

यासोबतच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व बळी भाऊ मोरे महासचीव, संतोष साळवे, ब्राह्मणंद मोरे, गजानन मोरे, बाबासाहेब मोरे, काभा साळवे, राम झोटे, विष्णु मोरे, संतोष राज आघाव, मुरली आघाव ,डॉ. केशव आघव संजय सरकटे ,वैभव आघाव, संतोष आघाव, समाधान डोके वझर आघाव येथील सर्व गावकरी उपस्थित होते.


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.