“सावित्री फुले ते जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा”
प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने शैक्षणिक कार्याबद्दल कर्तृत्वान महिला शिक्षिकांचा सत्कार
शेगांव :
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये “जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” अभियान राबविण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले होते त्यानुसार सदर अभियानांतर्गत राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जलंब येथे कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिला शिक्षिका रजनीताई धारपवार,सुषमा खेडकर यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच साडीचोळी देऊन प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशी दोन महत्त्वाची स्त्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले आहेत,छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाज कंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे. या दोन महान स्त्रियांचा कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल या उद्देशाने कर्तृत्ववान महिला सन्मानाचा उपक्रम जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने राबविण्यात आलेला आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,कार्याध्यक्ष सचिन वडाळ,अनिल खेडकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी,विनायकराव वडाळ,रूपाली धारपवार,सृष्टी मोरे,आर्या वडाळ,नंदिनी धारपवार,जुई वडाळ,निसर्ग मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.