Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; निवडणुका घेण्याचे SC चे आदेश

SC Hearing on OBC Reservation Live

0

SC Hearing on OBC Reservation Live : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम झालाय. याच पार्श्वभूमीवर आज (20 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या सुनावणीत माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाच्या शिफारशींवर न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीनं आरक्षणासाठी खूप प्रयत्न केलेत. आरक्षणाबाबत आम्ही सगळी माहिती गोळा केली आणि बांठिया अहवाल सरकारकडून सादर झाला. आम्हाला या निकालाचा आनंद आहे, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. लोकसंख्येनुसार, ओबीसी आरक्षण द्यावं, असं अहवालात नमूद केलंय. ओबीसी संख्या जिथं कमी आहे, तिथं आरक्षण द्यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आरक्षणाबाबत 99 टक्के काम महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

ही लढाई आम्ही जिंकलीय. उध्दव ठाकरे आणि अजित पवार असते, तर ही लढाई आम्ही जिंकली नसती. पण, राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार आल्यामुळे ही लढाई जिंकली असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, ओबीसी आरक्षण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मत

निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतोय, ओबीसी आरक्षण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मत

बांठिया अहवालानुसार पुढच्या निवडणुका घ्याव्यात, कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना

सुप्रीम कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरु झालं आहे.

निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत, असं आम्हाला वाटतं : कोर्ट

याचिकाकर्ते अहवालाला आव्हान देऊ शकतात, असंही कोर्टानं म्हटलंय.

आडनावानुसार जनगणनेस याचिकार्त्यानं आक्षेप घेतलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.