जि.प.प्रा.शाळा जलंब येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न
उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले नवोगत विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जलंब येथील जि.प.म.प्रा.शाळा (मुले),जि.प.म.प्रा.कन्या शाळा व जि.प.म.प्रा.स्टेशन शाळा या शाळेच्या संयुक्त विद्यमानाने शाळा पुर्व तयारी मेळावा दि. १ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पल्लवी देवचे यांच्या हस्ते करण्यात आले.या मेळाव्यात मुख्याध्यापक,लोकप्रतिनिधी,शिक्षक, अंगणवाडीताई,पालक,माता पालक, स्वयंसेवक यांनी सक्रीय सहभाग घेतला होता, इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य विकसित व्हावेत, आत्मविश्वासासह शाळेत पहीले पाऊल पडावे या दृष्टीकोनातून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावा या उद्देशाने स्टॉल लावण्यात आले होते. सर्व स्टॉल वर विद्यार्थ्यांनी कृतियुक्त सहभाग घेतला.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शालेय उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन गायकवाड,विषय तज्ञ विनोद वैतकार, मंगेश भोरसे,मुख्याध्यापक अजाबराव पहुरकर,निशा बोराळे,कल्पना गव्हादे,सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक,शिक्षक,दिलीप बळी,दिपक अकोटकार,सुभाष खंडेराव,रजनी धारपवार, सिमा तवार,सारिका दुप्पलवार,निर्मला गिरी,कल्पना गव्हादे,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती.
शाळा पुर्व तयारी मेळाव्याला उपस्थित उपशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षकवृंद