आकाशज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर शालेय विद्यार्थ्यांनी भावफुलांची ओंजळ वाहून व्यक्त केली कृतज्ञता
शेगांव :
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ञ तसेच कवियत्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेतील बालकांनी कृतज्ञतापूर्वक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर भावपूर्ण फुलांचा वर्षाव करून अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावर विस्तृत माहिती सांगितली.
याप्रसंगी शालेय शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.