Take a fresh look at your lifestyle.

SBI | ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ईएमआय वाढणार..SBI ने व्याजदर वाढवला

SBI ने व्याजदर वाढवला

0

SBI | देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट (Base Rate)वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय (EMI) वाढणार आहे अथवा ग्राहकांना ईएमआय तोच ठेवण्यासाठी कर्ज कालावधी वाढवावा लागणार आहे.

बेस रेटमध्ये वाढ

एसबीआयने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 आधार अंकांची म्हणजे 0.7 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बेस रेटमध्ये ही 70 आधार अंकांची वाढ झाली. BPLR आता वार्षिक 13.45 टक्के तर बेस रेट 8.70 टक्के असेल. यापूर्वी 15 जून 2022 रोजी हे दर वाढवण्यात आले होते.

ग्राहकांना झटका

फ्लोटिंग दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता वाढेल. वाढलेल्या व्याजदराची रक्कम त्यांच्या ईएमआयमध्ये (EMI) समाविष्ट होईल. त्यामुळे हप्ता वाढेल. काही ग्राहक हप्त्याचा भार वाढू नये यासाठी कर्ज कालावधी वाढवू शकतात.

यांच्यावर परिणाम

ज्यांनी जुलै 2010 आणि मार्च 2016 यादरम्यान फ्लोटिंग रेट आधारे गृहकर्ज घेतले आहे. त्यांना या व्याजदर वाढीचा फटका बसणार आहे.

बेंचमार्क प्राईम लेडिंग रेट म्हणजे काय?

बेंचमार्क हा व्याज दरांवर परिणाम करणारा मानक दर आहे. या दरांमुळे कर्ज प्रकरणातील व्याजांचे दर निश्चित करण्यात येता

RBI ने रेपो दर वाढवला

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनवाढीचा अंदाज घेत रेपो दरात 0.5 टक्क्यांची वाढ केली. या वर्षाच्या सुरुवातीला व्याजदरात वाढ करण्यात आली होती. आरबीआयने तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे.  त्यामुळे बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृह, वाहन कर्ज वाढले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.