Take a fresh look at your lifestyle.

जळगावसह अन्य विमानतळांवर सेवा विस्तार

जळगाव : महाराष्ट्रातील मोठ्या विमानतळांसह जळगाव, सोलापूरसारख्या नव्याने विकसित झालेल्या विमानतळांवरील सेवांच्या विस्तारीकरणाबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना साकडे घातले.

0

विविध विमानतळांच्या विकास व सेवांच्या विस्ताराबाबत नागरी उड्डाण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू, असे आश्‍वासन मंत्री सिंधिया यांनी यावेळी दिले.

‘असोचेम’ या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित हवाई वाहतूक परिषदेप्रसंगी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सिंधिया यांची भेट घेऊन चर्चा केली, त्याप्रसंगी त्यांनी हे आश्‍वासन दिले. चेंबरच्या महिला समितीच्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली. कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर येथून नवीन हवाई सेवांचा प्रारंभ, विमानतळ विस्तारीकरण यावर प्राधान्याने लक्ष देण्याची विनंती केली. सोलापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक नियमित सुरू होण्यामधील अडथळे दूर करणे, पुणे मुंबई येथील नवीन विमानतळांच्या कामाची गती वाढविणे, अमरावती, अकोला, रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणे आदी मागण्यांकडे गांधी यांनी सिंधिया यांचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.