Take a fresh look at your lifestyle.

शिवजयंती विशेष! छ. शिवाजी महाराजांच्या ‘या’ गोष्टी आजही आपल्याला जगण्याला प्रेरणा देतात

0

भारत देशाला खूप मोठ्या इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. मात्र या परंपरेत अगदी पायापासून ते कळसापर्यंत इतिहासामध्ये भर घालण्याचे काम, जर कोणी केले असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाने.

असे म्हणले जाते की, छ. शिवाजी महाराज जगातील एकमेव राजा असे आहेत की त्यांच्या चरित्रावर कुठेही डाग नाही. त्यांच्या चरित्र पासून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या चारित्र्या पासून ऊर्जा निर्माण होते.

आज याच स्वराज्याच्या धन्याची म्हणजेच छ. शिवाजी महाराजांची शिवजयंती याच शिवजयंतीनिमित्त आज आपण शिवरायांच्या चरित्रातून काही प्रेरणादायी गोष्टी पाहणार आहोत.

१) संघटन कैशल्य:- छ. महाराजांनी स्वराज्यसाठी लागणाऱ्या मावळ्यांना एकेक करून त्यांच्यातील विविधांगी कौशल्य ओळखून प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी देऊन स्वराज्य वाढवले. आणि सोबतच त्यांनी स्वतःचे संघटन कौशल्य सुद्धा वाढवले.

शिवाजी महाराज आणि अलेक्झांडर यांची तुलना केली असता, अलेक्झांडरला त्याचे सैन्य अनेकदा सोडून निघून गेले होते. मात्र शिवाजी महाराजांच्या बाबतीत असा कोणताच प्रकार आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही. त्याउलट स्वराज्यातील मावळे जुलमी सत्तेविरुद्ध आपले धर्म रक्षण कराण्यासाठी मरणाला सामोरे गेले. पण महाराजांशी बेईमान केली नाही.

२) नेतृत्व:- छ. शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य खूपच उल्लेखनीय होते. गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढायला जिंकलेला राजा म्हणून छ. शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. अवघे पन्नास वर्षाचे आयुष्य लाभले असताना सुद्धा शिवरायांनी आपल्या नेतृत्वाच्या जोरावर अनेक कामगीरी केल्या.

मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाहतो की, काही मिळत नाही म्हणल्यावर माणसे राजकीय पक्ष बदलतात, गट बदलतात सगळंच बदलायला तयार असतात.

पण १६८० साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. १६८१ ते १७०७ औरंगजेब नावाच्या एका कसलेल्या सेनापती विरुध्द सत्ताविस वर्षे मराठे कोणतेही खंबीर नेतृत्व नसताना, विजयाची आशा नसताना लढत होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांकडून काहीच मिळणार नाही याची खात्री असताना सुद्धा माणसे महाराजांसाठी लढत राहिली.

कारण मराठे लढत होते ते, छत्रपतींनी त्यांच्या खांद्यावर दिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या निषाणासाठी, आणि मनामध्ये निर्माण केेलेल्या स्वराज्यासाठी. असे लढणे जगाच्या इतिहासात कधीच कोणी कोणासाठी लढले नाहीत. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याच्या मनात तशी नेतृत्व क्षमता जागृत केली होती.

३) युद्धकौशल्य:- राजा म्हणले की लढाई, युद्ध, रणांगण, राज्याचे अधिकार अशा गोष्टी येतच असतात. मात्र छ. शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते, ज्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर कनिमी काव्याचा वापर करून अनेक युद्धे जिंकली होती.

एक ऐबे कॅरे नावाचा पश्चिमात्य प्रवासी छत्रपती शिवजी महाराजांविषयी लिहितो की, “शिवाजीराजे पूर्वेने पाहिलेल्या उत्तमतील उत्तम योध्यापैकी एक म्हणून त्यांची गणना होऊ शकते.” कारण अफजलखानाची भेट, शाहिस्तेखानवर अचानक केलेले हल्ला, संगमनेरची लढाई, आग्राचे संकट हे सर्व संदर्भ पाहता शिवाजी राजे युद्ध कौशल्याच्या पहिल्या फळीत बसतात.

४) स्त्रीयांचा आदर:- शिवाजी महाराजांचा एकमेव दरबार असा आहे की जिथे कधीही कोणती स्त्री चे नाच गाणे झाले नाही. त्याचसोबत महाराजांचा स्त्री विषयीचा आदर हा आपल्याला मोगल इतिहासकार खाफीखान याच्या लेखनात आढळतो.

खाफीखान हा औरंगजेबाचा इतिहासकार होता. त्याने, ‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे. शिवाजीसारखा चारित्र्य संपन्न व परधर्माबद्दल सहिष्णू असलेला राज्यकर्ता या देशात दुसरा दिसत नाही. स्त्रीयांच्या बाबतीत शिवाजी राजाला कमालीचा आदर आहे.’’ असे लिहिले आहे.

तसेच रांज्याच्या पाटलांचे हात पाय कलम केलेल्या आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बहिणीचा दर्जा देऊन माघार पाठवणार किस्सा तर आपणा सर्वास ठाऊकच आहे. यावरूनच आपल्याला छ. शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयीच्या धोरणाची कल्पना येते.

५) विज्ञानवादी:- छ. शिवाजी महाराज जेवढी परंपरा पाळत होते. तेवढेच शिवाजी महाराज हे विज्ञानवादी सुद्धा होते. याची अनेक उदाहरणं आपल्याला शिवरायांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. जसे की, अमावस्येच्या रात्री बाहेर पडू नये. या अशी विचारणला शिवाजी महाराजांनी फाटा दिला आणि महाराजांनी अनेक युद्धे ही अमावस्येच्या रात्री केली.

तसेच, सातासमुद्रा बाहेर जाऊ नये, किंवा समुद्र विषयी असलेली धारणाही महाराजांनी मोडीत काढली. आणि समुद्रावर सत्ता गाजविणारा व स्वतःचे आरमार उभा करणारा भारताच्या इतिहासातील पहिला राजा म्हणून महाराजांना मान मिळाला.

तर या होत्या छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातली आजही आपल्याला प्रेरणा देणाऱ्या काही खास गोष्टी. मात्र या गोष्टी वगळता शिवाजी महाराज हे आपणा सर्वानाच वेळोवेळी प्रेरणास्थान आहेत. यात मात्र तिळमात्र शंका नाही.

-निवास उद्धव गायकवाड

Leave A Reply

Your email address will not be published.