Take a fresh look at your lifestyle.

90 किलो वजन असलेल्या सोनाक्षी सिन्हाने ‘असं’ घटवलं होतं ३० किलो वजन

असा होता सोनाक्षी सिन्हाचा खास डाएट प्लॅन

0

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस आहे. सोनाक्षीनं आजवर अनेक सिनेमांमध्ये तिच्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे. २०१० सालामध्ये आलेल्या ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सोनाक्षी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असली तरी तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली होती. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षीचं वजनं तब्बल ९० किलो होतं.

सलमान खानच्या सांगण्यावरून सोनाक्षी सिन्हाने तिचं वजन कमी केलं होतं असा खुलास तिने एका मुलाखतीत केला आहे. वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने शाहिद कपूरच्या ट्रेनरची मदत घेतली होती. सोनाक्षी सिन्हा प्रचंड फूडी होती. मात्र वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने जंक फूड खाणं पूर्ण बंद केलं. कार्डियो एक्सरसाइज, साइकलिंग, स्विमिंग तसचं हॉट योगाच्या मदतीने सोनाक्षीने वजन कमी करण्यावर भर दिला. हेल्दी आणि प्रोटीन असलेले पदार्थ ती खावू लागली. पचन क्रिया सुधारण्यासाठी प्रत्येक दोन तासांनी ती नियमीत खात असे.

असा होता डाएट
सोनाक्षी ब्रेकफास्टमध्ये रोज ओटस् आणि अंड्यांचा समावेश करायची. तसचं दूध आणि गव्हाच्या टोस्टचा ती ब्रेकफास्टमध्ये समावेश करते. लंचमध्ये डाळ आणि भाज्या ती खायची. कधी कधी चिकन आणि माश्यांचा तिच्या जेवणात समावेश असतो. रात्री उशीरा जेवण्याऐवजी ती लवकरच रात्रीचं जेवण उरकते. शिवाय डिनरमध्ये लो कार्ब अन्नाचा समावेश असायचा.

शरीराला डिटॉक्स आणि हायड्रेट ठेवण्यासाठी ती दिवसातून ८-९ ग्लास पाणी पिते. तसचं दिवसातून एक वेळा ज्यूस आणि ग्रीन टीचं सेवन करते.

एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली होती की तिला झिरो फिगरचा मोह नाही. मात्र शरीर वळणदार असावं आणि सोबतच फिट असणं गरजेचं आहे. केवळ सडपातळ असून उपयोग नाही हेल्दी असणं जास्त गरजेचं आहे.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.