जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप
शाळा बंदमुळे शालेय कामकाज ठप्प
शेगांव: नोव्हेंबर २००५ पासुन नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांची राज्य शासनाने पेन्शन बंद केलेली आहे,सदर जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे सुरू करावी या मागणीसाठी राज्यातील विविध संघटनांनी पाठींबा देऊन सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे.

शेगांव तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिका-यासह शिक्षक संपात सहभागी झालेले असुन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू होण्यासाठी दिनांक १४
मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत यासंदर्भातील संपाचे निवेदन गटविकास अधिकारी सतिष देशमुख व गटशिक्षणाधिकारी एस.डी वायदंडे यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी समन्वय समितीचे पदाधिकारी सुनिल घावट,प्रमोद इंगळे प्रविण कात्रे,एस.डी.पाटील,अनंतराव वानखडे,नवल पहुरकर,शकील अहमद यासह बहुसंख्येने उच्चश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये निवेदन सादर करण्यात आलेले असुन तालुक्यातील शाळांचे कामकाज बेमुदत संपामळे ठप्प पडलेले दिसुन आले आहे.