आमदार बच्चूभाऊ कडु यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने राज्यव्यापी… शिक्षक सामाजिक दायित्व सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शेगांव :
महाराष्ट्रातील शोषित,पिडीत, वंचित घटकाचा बुलंद आवाज,शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,शिक्षक, कामगारांचे लढवय्ये,सरसेनापती,दिव्यांगाचे मसिहा आमदार बच्चूभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जुलै ते ११ जुलै २०२२ पर्यंत राज्यव्यापी शिक्षक सामाजिक दायित्व सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत असुन या कार्यक्रमाअंतर्गत शालेय व शासकीय कार्यालय परिसरात वृक्षारोपण शालेय परिसर, शासकीय रुग्णालय स्वच्छता शिबिर,गुणवंत विद्यार्थी व पालक सत्कार,शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी व उपचार शिबिर,आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील पाल्यांना मदत.रक्तदान शिबिर
गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदि उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या राज्यव्यापी शिक्षक सामाजिक दायित्व सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे व जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्यातून शालेय परिसरात वृक्षारोपण व शालेय परिसर स्वच्छता हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यव्यापी शिक्षक सामाजिक दायित्व सप्ताहाच्यानिमित्ताने वृक्षारोपण रोपण करतांना शालेय विद्यार्थीनी व शिक्षक